काश्मिर घाटीमध्ये घडलेल्या हिंदूंच्या हत्येचा बजरंग दलातर्फे निषेध

 काश्मिर घाटीमध्ये घडलेल्या हिंदूंच्या हत्येचा बजरंग दलातर्फे निषेध              

आतंकवादाचा राजकीय हत्यार म्हणुन प्रयोग करणार्या जिहादी पाकीस्तानवर अंकुश लावण्याकरिता विश्वसमुदायाने पुढे यावे-विवेक कुलकर्णी   
नगर- काश्मीर घाटीत गेल्या ५ दिवसात सात भारतीयांच्या केल्या गेलेल्या हत्या व नवरात्रीच्या काळात एका शिख महिला शिक्षिकेची हत्या यावर तीव्र चिंता व आक्रोश व्यक्त करीत आज केंद्रसरकार कडे या निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत.जिहादी आतंकवादाचा पूर्णत:विनाश करण्याकरिता पाकिस्तानला "न भूतो न भविष्यती"असे उत्तर द्यावे.   तसेच हिंदुंना काश्मीर घाटीत पुनर्स्थापित करुन त्यांना स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी सुयोग्य व्यवस्था सुनिश्चित  करावी.

जिहादी आतंकवादाला जशास तसे उत्तर देणे.आम्ही योग्य पद्धतीने जाणतो.बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा एक एक कार्यकर्ता यासाठी तत्पर आहे.

आतंकवादाचा राजनैतीक हत्यार म्हणून प्रयोग करणाऱ्या जिहादी पाकिस्तान वर अंकुश लावण्या करिता विश्व समुदायाने पुढे यावे. अशी मागणी बजरंग दलाचे क्षेञीय सह संयोजक विवेक कुलकर्णी यांनी केली.                                                     दिल्लीगेट येथे विश्व हिंदु परिषद,बजरंग दला तर्फे पाकीस्तानचा निषेध करुन जिहादी आतंकवादाचा तीव्र निषेध करण्यात आला.याप्रसंगी विश्वहिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅड.जय भोसले, मठमंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे,जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, बजरंगदलाचे शहर संयोजक कुणाल भंडारी,सतिश सायंबर, दिग्विजय बसापुरे,शहरमंत्री श्रीकांत नांदापूरकर आदी उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post