सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुकुमशाही ?...अमित शहा म्हणाले...

 सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुकुमशाही... अमित शहा म्हणाले...  
 नवी दिल्ली: मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून काम करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 20वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मीडियाशी संवाद साधला. 

अमित शहा यांनी संसदेच्या टीव्हीला प्रदीर्घ मुलाखत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. पंतप्रधान कुणाचेच ऐकत नाहीत का? एकटेच निर्णय घेतात का? मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात का? यात किती तथ्य आहे? असं अमित शहा यांना विचारलं असता, मी मोदींसारखा श्रोता आजवर पाहिलेला नाही. मी मोदींचं काम जवळून पाहिलं आहे. ते धैर्याने निर्णय गेतात. ते शेवटच्या व्यक्तीचंही म्हणणं ऐकून घेतात. एखाद्या व्यक्तीने सूचवलेली गोष्ट महत्त्वाची असेल तर त्याचा स्वीकारही करतात. तो मुद्दा कुणी मांडला हे महत्त्वाचं नसतं. तर तो मुद्दा किती महत्त्वाचा आहे हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं, असं शहा म्हणाले.

मोदींचं काम मी अगदी जवळून पाहिलं आहे. त्यांच्यावर हुकूमशाहीचे लावण्यात आलेले आरोप सर्व खोटे आहेत. तथ्यहीन आहेत. ते कोणत्याही बैठकीत अगदीच मोजके बोलतात. त्यानंतर सर्वांचं ऐकून ते निर्णय घेतात. कधी कधी तर एवढा काय विचार करायचा? एखाद्या विषयावर एवढी चर्चा कशाला करायची असं आम्हाला वाटतं. पण मोदी सर्वांचं ऐकून घेतात. छोट्या छोट्या विधानाचीही ते दखल घेतात आणि गुणवत्तेच्या आधारेच निर्णय घेतात. त्यामुळे मोदी निर्णय लादतात असं म्हणणं चुकीचं असून त्यात काहीच तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post