नगरमध्ये महाविकास आघाडी कायम एकत्र राहणार: आ.संग्राम जगताप

 महिला बाल कल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे


व उपसभापती मीना चोपडा यांनी घेतला पदभार     नगर - राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने या विकास आघाडीच्या माध्यमातून जनतेचे कामे होत आहेत. तीच परंपरा आम्ही नगरमध्येही सुरु ठेवून महाविकास आघाडीचा महापौर, उपमहापौर, महिला बाल कल्याण समितीच्या पदावर आघाडीतील पक्षांना स्थान देऊन समन्वयातून निवडी केल्या आहेत. ही महाविकास आघाडी विकासासाठी  कायम एकत्र राहणार असून, त्या माध्यमातून नगरच्या विकासाला चालना देण्याचे काम या माध्यमातून होणार आहे , असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

     महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौ.पुष्पा बोरुडे व उपसभापती सौ.मीना चोपडा यांनी आज आमदार संग्राम जगताप व महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांच्या उपस्थितीत पदभार स्विकारला. याप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, माजी महापौर सुरेखा कदम, भगवान फुलसौंदर, संजय शेंडगे, अनिल बोरुडे, संजय चोपडा,  नगरसेवक कुमार वाकळेसंभाजी कदमप्रकाश भागानगरेसुवर्णा जाधवसंपत बारस्करविनित पाउलबुधेसुभाष लोंढेनिखिल वारेशाम नळकांडेसचिन शिंदेप्रशांत गायकवाडमंगल लोखंडेअजिंक्य बोरकरप्रा.माणिक विधातेरेश्मा आठरेआशा निंबाळकरअरुण गोयलयोगीराज गाडेमदन आढावकमल सप्रेदिपाली बारस्करसुवर्णा गेनप्पा आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post