ग्रामसभेवरून वादंग..आजी माजी सरपंचाविरोधात गुन्हा दाखल....

आजी माजी सरपंचाविरोधात गुन्हा दाखल....नगर: पारनेर तालुक्यातील जवळे येथील आजी-माजी सरपंच  त्यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जवळे येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सत्ताधार्‍यांचा तोल सुटल्याने वाद होऊन ग्रामसभा अर्ध्यावर गुंडाळण्याची नामुष्की पदाधिकार्‍यांवर ओढवली होती. मात्र, त्यानंतर काही मोजके ग्रामस्थ यांना हाताशी धरून  चार दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी भरवलेल्या प्रति ग्रामभेला उत्तर देणे सत्ताधिकार्‍यांनी सुरू ठेवले. यावेळी प्रति ग्रामसभा भरवणारे व त्यांचे पाठीराखे कोण होते त्यांच्याकडे पाहून घेतो, म्हणत प्रति ग्रामसभा भरवण्यासाठी पुढाकार घेणारे रामदास घावटे यांना यावेळी शिवीगाळ व अपशद्ब वापरण्यात आले. 

दरम्यान घावटे यांनी जवळे गावचा विकास आराखडा तयार करून प्रति ग्रामसभेसमोर ठेवला होता. तसेच सामाजिक हिताचे काही निर्णय घेण्यास ग्रामसभेला सुचवले होते. यावरून मात्र, सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले होते. 

ही बाब मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर पसरल्यामुळे चांगल्या सूचना ग्रामसभेत सुचवणार्‍यांचा आवाज दडपल्याप्रकरणी व भावना दुखावल्यामुळे ग्रामसभेत दडपशाही करणारे माजी सरपंच सुभाष भाऊसाहेब आढाव, तंटामुक्ती अध्यक्ष, चेअरमन व  सरपंच शिवाजी धोंडीबा सालके, उपसरपंच गोरख शिवाजी पठारे या आजी-माजी सरपंचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पारनेर पोलिसांकडे याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन भाऊसाहेब खेडेकर, बबनराव कवाद, भानुदास साळवे, सुनील चौधरी, दत्ता जाधव यांनी दिले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post