राष्ट्रीय महामार्गावर बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक, 7 जणांचा जागीच मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावर बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक,  7 जणांचा जागीच मृत्यू  भोपाळ - मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली. येथील राष्ट्रीय महामार्गावर बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक बसली. या भीषण दुर्घटनेत 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 13 जण जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात येत असून स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघाताची घटना घडताच मोठा गोधळ सुरू झाला. प्रवाशांची ओरड आणि मदतीच्या याचनेने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. गोहद चौक ठाणे परिक्षेत्रातील डॉग बिरखडी येथे ही घटना घडली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post