शिवसेना आमदाराचा मोठा गौप्यस्फोट! एका मतासाठी 3 हजार मोजले, पार्ट्या अन्....

शिवसेना आमदाराचा मोठा गौप्यस्फोट! एका मतासाठी 3 हजार मोजले, पार्ट्या .... पंढरपूर : साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये होत असलेला पैशांचा वापर आणि निवडणुकांचे धक्कादायक वास्तव समोर आणणारा मोठा गौप्यस्फोट शिवसेनेच्या एका आमदाराने केला आहे. शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलतांना स्वत:विषयीच मोठा गौप्यस्फोट केला आहे. पाटील यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर साखर कारखान्यांच्या निवडणुकांमधील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.शहाजी पाटील यांनी कार्यक्रमात बोलतांना निवडणूक जिंकण्यासाठी काय काय क्लृप्त्या केल्या, आमिषे दाखवली याचा एक प्रकारे कबुली जबाबच दिला. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांची माफीही मागितली. निवडणूक लढवताना एका मतासाठी 3 हजार मोजले, पार्ट्या केल्या, असे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी मान्य केले.

काही वर्षांपूर्वी सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या निवडणुकीत मतदारांना तीन तीन हजार रुपये रोख वाटले. यावेळी या मतदारांना हव्या तितक्या पार्ट्या देखील दिल्या. तब्बल 57 लाख रुपये वाटून ही निवडणूक लढवली होती, असा गौप्यस्फोट शहाजी पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post