महिला प्राध्यापिकेचा विनयभंग, 2 प्राचार्यांवर गुन्हा दाखल

 

महिला प्राध्यापिकेचा विनयभंग, 2 प्राचार्यांवर गुन्हा दाखल चंद्रपूर : बल्लारपूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नालॉजी, बामणीच्या दोन्ही प्राचार्यांवर एका महिला प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याप्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. रजनीकांत मिश्रा आणि श्रीकांत गोजे अशी या प्राचार्यांची नावे आहेत. ते दोघेही फरार झाले आहे. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष संजय वासाडे आहेत. 


संजय वासाडे यांच्यासह या दोन्ही प्राचार्यांनी काल रविवारी माध्यमांसमोर येवून प्राध्यापिकेचा विनयभंग आणि देशी कट्टा विद्यार्थ्यांकडून मागितल्याची बाब फेटाळली होती. बल्लारपूर पोलिस ठाण्यात त्याच रात्री दोन्ही प्राचार्यांवर गुन्हा दाखल झाला आणि वासाडे तोंडघशी पडले. त्यानंतर दोन्ही प्राध्यापक फरार झाले.


पिडीत प्राध्यापिका या संस्थेत मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. सहा ऑक्टोंबरला ती आपल्या कक्षात काम करीत असताना प्राचार्य रजनीकांत मिश्रा आणि श्रीकांत गोजे तिथे आले. गोजे या संस्थेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य आहे. या दोघांनीही प्राध्यापिकेला तिच्या कक्षात अश्लिल शिवागाळ केली. तिचा हात पकडला आणि तिचे कपडे ओढण्याचा प्रयत्न केला. झाला प्रकार तिने संस्थेचे कार्याध्यक्ष वासाडे यांच्या कानावर टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु वासाडे यांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले नाही. उलट या दोघांचीही पाठराखण केली.

या प्राध्यापिकेने बल्लारपुर पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post