माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची नातीची बॉलीवूडमध्ये एंट्री...‘बंटी और बबली 2’ मध्ये झळकणार

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची नातीची बॉलीवूडमध्ये एंट्री...‘बंटी और बबली 2’ मध्ये झळकणार सध्या सोशल मीडियावर 'बंटी और बबली 2' या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.  'बंटी और बबली' या चित्रपटाचा हा सिक्वल असून यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. मनोहर जोशी यांच्या नातीचं नाव शर्वरी वाघ असं असून 'बंटी और बबली 2' या चित्रपटात ती बबलीची भूमिका साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाला असून शर्वरीच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. शर्वरी तिच्या अभिनयासोबतच ग्लॅमरस फोटोमुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रीय असलेली शर्वरी अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. शर्वरी ही मनोहर जोशी यांची नात असून शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांनी मुलगी आहे. शर्वरीच्या वडिलांचे नाव शैलेश वाघ असून ते प्रसिद्ध उद्योगपती आहेत. तर तिची आई नम्रता आर्किटेक्ट आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post