केंद्रीय मंत्री गडकरींच्या दौर्‍यासंदर्भात भाजपच्या 2 पत्रकार परिषदा....खा.विखे म्हणाले...

 केंद्रीय मंत्री गडकरींच्या दौर्‍यासंदर्भात भाजपच्या 2 पत्रकार परिषदा....खा.विखे म्हणाले...नगर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोन ऑक्टोबर रोजी नगर दौर्‍यावर येत आहेत. ते नगर शहर व जिल्ह्यातील महामार्गांच्या कामांचे भूमीपूजन करणार आहेत. गडकरी यांच्या या दौर्‍याबाबत माहिती देण्यासाठी भाजपकडून दोन स्वतंत्र पत्रकार परिषदा घेण्यात आल्या. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी बुधवारी सायंकाळीच पत्रकार परिषद घेवून गडकरींच्या दौर्‍याची माहिती दिली.  त्यानंतर गुरुवारी सायंकाळी खा.डॉ.सुजच विखेंनी पत्रकार परिषद घेतली तीच माहिती दिली. याबाबत विचारणा केली असताना खा.विखे म्हणाले की, गडकरी यांच्या दौर्‍याचा अधिकृत कार्यक्रम गुरुवारी सकाळी प्राप्त झाला. त्यानुसार माहिती दिली. शहर जिल्हाध्यक्षांना कदाचित थेट संपर्कातून दौर्‍याची माहिती मिळाली असल्याने त्यांनी आधी पत्रकार परिषद घेतली असेल असे विखे यांनी सांगितले.  विशेष म्हणजे खा.विखेंच्या पत्रकार परिषदेला शहर जिल्हाध्यक्ष गंधे अनुपस्थित होते. पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post