बाजारपेठेतून भरदिवसा 1 लाखाची रोकड पळविली

 नगरच्या बाजारपेठेतून भरदिवसा 1 लाखाची रोकड पळविलीनगर- नगर शहरातील अतिशय गजबजलेल्या नवीपेठेतून भरदुपारी व्यापार्‍याची 1 लाख रुपयाची रोकड असलेली बॅग 2 मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात 4 चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना सोमवारी (दि.25) दुपारी 1.25 वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत दिनेश प्रकाश थवानी (रा.सिंधी सोसायटी, बोरुडे मळा, बालिकाश्रम रोड) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. थवानी यांचे फर्निचरचे दुकान असून ते नवीपेठेत असलेल्या आधुनिक कुरइर कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांच्या ऍव्हिएटर या मोपेडच्या डिक्कीत (क्र.एम.एच.16, बी.डी.1115) ठेवलेली 1 लाख रुपयांची रोकड 2 मोटारसायकलींवर आलेल्या अज्ञात 4 चोरट्यांनी चोरुन नेली.  या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि.क. 379, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post