घर खाली करण्यासाठी भाडेकरूने मागितले 10 लाख, त्रस्त घरमालकाची गळफास घेवून आत्महत्या...

 घर खाली करण्यासाठी भाडेकरूने मागितले 10 लाख, त्रस्त घरमालकाची गळफास घेवून आत्महत्या...नागपूर : भाडेकरू घरभाडे देण्यास टाळाटाळ करीत आहे. घर रिकामे करण्यासाठी त्याने दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली असून, ठार मारण्याची धमकी देत आहे, अशा आशयाची चिठ्ठी लिहून घरमालकाने आत्महत्या केली. घरमालकाने भाडेकरूकडून होत असलेल्या छळाच्या माहितीचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करून तो समाजमाध्यमावर व्हायरल केला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी भाडेकरू दोन भावांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. राजेश नामोमल सेतिया (वय ४५) व त्याचा मोठा भाऊ, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची तर मुकेशकुमार श्रीचंद रिझवानी (वय ४६ रा. कस्तुरबानगर), असे मृतकाचे नाव आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post