गणेशोत्सवात राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाचा इशारा

गणेशोत्सवात राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाचा इशारा  पावसासंदर्भात अतिशय महत्वाची बातमी.  गणपती उत्सवात मुसळधार पाऊस   कोसळणार आहे. तसा इशार हवामान विभागाने दिला आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे हे वारे पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे   भारतीय हवामान विभागाने सांगितले. तसेच मुंबईत मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अनेक ठिकाणी अधूनमधून तीव्र पावसाची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post