मनविसेचा मनपा इंजिनिअर साहेबांना " दे धक्का "...जाब विचारा आंदोलन सुरू

 मनविसेचा मनपा इंजिनिअर साहेबांना " दे धक्का "...जाब विचारा आंदोलन सुरू
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली कालच महानगरपालिकेमध्ये खड्ड्यांचे प्रदर्शन भरवून नगर शहरातील खड्ड्यांचा मोठा प्रश्न समोर आणला होता . या आंदोलनावेळी आयुक्तांशी चर्चा करत असताना आयुक्त साहेबांनी सांगितले होते की "खड्डे बुजवण्यासाठी आमचा माणूस त्या ठिकाणी उभा आहे , तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा" आणि संबंधित अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर दिले हाच धागा धरून मनविसेने आता थेट नगरकरांना अधिकाऱ्यांचे नंबर उपलब्ध करून दिले आहे. जेणेकरून आपापल्या प्रभागातील परिसरातील खड्ड्यात बाबत त्या अधिकाऱ्यांसोबत  थेट संवाद सर्वसामान्य नगरकरांचा होऊ शकतो या आंदोलनाने संबंधित अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडणार आहे एवढं नक्की सर्वसामान्य नगरकर जोपर्यंत स्वतः व्यक्तिशः या आंदोलनात उतरत नाही तोपर्यंत मनपा प्रशासन देखील कासवगतीने च काम करत राहील यासाठी नगरकरांनी स्वहित जपणे गरजेचे आहे. इंजि.मा.श्री‌.इथापे साहेब ९५६१००४६२८ व इंजि.मा.श्री.निंबाळकर साहेब ९५६१००४६२० या दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधून या अधिकाऱ्यांकडून काम करून घ्या आणि नागरिकांसोबत जर या अधिकाऱ्यांनी अरेरावीची अथवा असहकार्याची भाषा वापरली तर मनविसे त्या विरोधात खळ्ळ खट्याळ चे आंदोलन नक्कीच केले जाईल तरी नागरिकांनी आमच्या सोबत संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post