बहिणच झाली वैरी, प्रियकराच्या मदतीने केली बहिणीची निर्घुण हत्या....

बहिणच झाली वैरी, प्रियकराच्या मदतीने केली बहिणीची निर्घुण हत्या.... 



कराड : कराड येथील वाखाण भागात शनिवारी एका महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.  पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, बहिणीनेच ही हत्या केल्याचं उघड झालं आहे. आरोपी महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीनेच बहिणीला संपवलं असल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बहिणीसह तिच्या प्रियकराला अटक   केली आहे. या घटनेचा पुढील तपास कराड पोलीस करत आहेत.

ज्योती सचिन निगडे (वय-27) आणि सागर अरुण पवार (वय-28) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपी कराडनजीक असणाऱ्या मलकापूर येथील रहिवासी आहेत. तर उज्ज्वला रघुनाथ ठाणेकर असं हत्या झालेल्या 35 वर्षीय महिलेचं नाव आहे, त्या कराड येथील वाखाण येथील रहिवासी होत्या. आरोपी बहीण ज्योती आणि तिचा प्रियकर सागर यांनी शुक्रवारी शेतातून वाट काढत उज्ज्वला यांच्या घरात शिरले होते. त्यानंतर उज्ज्वला यांनी मारहाण करून त्यांनी तिची निर्घृण हत्या केली आहे. मृत उज्ज्वला याचं आरोपी बहीण ज्योती हिचा नवरा सचिन याच्यासोबत अनैतिक संबंध  होते. आपल्या पतीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून ज्योतीने आपल्या प्रियकराच्या मदतीने बहिणीची निर्घृण हत्या केली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post