तहसीलदार देवरेंच्या समर्थनावरुन चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादीची टिका, वाघ म्हणाल्या, "कोल्ह्या कुत्र्यांना मी घाबरणारी नाही...'

 तहसीलदार देवरेंच्या समर्थनावरुन चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादीची टिका, वाघ म्हणाल्या, "कोल्ह्या कुत्र्यांना मी घाबरणारी नाही...'
मुंबई : राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख  यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर काल नगरमध्ये बोचरी टीका केली होती. ‘लाचखोर नवऱ्याची बायको’, असा चित्रा वाघ यांचा उल्लेख आपल्या भाषणात शेख यांनी केला होता. याच टीकेला आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी वाघ आहे वाघ…, माझ्यावर कोल्हे कुत्रे भुंकत आहेत. पण मी कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही”, अशा शब्दात त्यांनी महेबूब शेख यांच्यावर पलटवार केला आहे.

 

“सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करुन झाले…. आता माझ्या परिवाराची बदनामी सुरु आहे. पण मी अ्सल्या प्रकाराला घाबरत नाही. मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या”, असं उघड आव्हानच त्यांनी शेख यांना दिलं आहे.

 तहसीलदार देवरेंच्या समर्थनावरुन चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादीची टिका, वाघ म्हणाल्या, कोल्ह्या कुत्र्यांना मी घाबरणारी नाही...


“वाघावर…..कोल्हे कुत्रे भुंकताहेत कारण मी पिडीतांच्या पाठीशी उभी राहते म्हणून……. पण शेवटी मी वाघ आहे… लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना मी घाबरणारी नाही”, अशा शब्दात त्यांनी मेहबूब यांचा वार परतावून लावला आहे. मेहबूब यांच्या टीकेला उत्तर देणारं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.


पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोव्हिड काळात केलेल्या कामाने ते पूर्ण देशात लोकप्रिय झाले. परंतु मागच्या महिन्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपाने ते अडचणीत सापडले होते. चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलं. ते पारनेर तालुक्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post