नगर जिल्ह्याला वरदान असलेले भंडारदरा धरण ओव्हरफ्लो...video

 नगर जिल्ह्याला वरदान असलेले भंडारदरा धरण ओव्हरफ्लो
       भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धुव्वाधार पर्जन्यमानामुळे आज दिनांक 12/ 9 /2021 रोजी साडेदहा वाजता धरणाचा पाणीसाठा ११०३९ द.ल.घ.फु. 100%  फुल झाला आहे.      या क्षेत्रात पाण्याचा जोर अजूनही कायम आहे त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक जास्त होऊ शकते म्हणून पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या सांडव्याद्वारे 2436 व विद्युत गृहाद्वारे 820 क्वीसेक असा एकूण 3256 क्वीसेक विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे.     तसेच प्रवरा नदीकाठच्या रहिवाशांना आपली तसेच आपल्या पशुधनाची व शेती अवजारांची काळजी घ्यावी असे पाटबंधारे विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post