भल्या पहाटे ऊसाच्या शेतातील जुगार अड्डयावर छापा, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांचा भल्या पहाटे ऊसाच्या शेतातील जुगार अड्डयावर छापा, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त


जामखेड -तालुक्यातील वंजारवाडी शिवारात सुरू असलेल्या जुगारअड्डय़ावर पोलिसांनी भल्या पहाटे छापा टाकून पाच लाखांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. याप्रकरणी 15जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बाळासाहेब हरिभाऊ साठे (रा. जवळके), घनश्याम कैलास डोळे (रा. खर्डा), हनुमंत उत्तम देवकर, अजय बबन साठे (दोघे रा. रत्नपूर, ता. परांडा, जि. धाराशिव), राजेंद्र उद्धव डहाळे (रा. तरडगाव), दादा लक्ष्मण इपार, रामा जानू आव्हाड, महादेव लक्ष्मण शेतकरी, संभाजी सीताराम कराड, संदीप भीमा भोसले (सर्व रा. वंजारवाडी), हर्षद नजमो शेख, महेश शहाजी काळे (रा. धनेगाव), किरण मुकुंद गोलेकर, प्रकाश रामकृष्ण गोलेकर, योगेश अण्णा सुरवसे (तिघे रा. खर्डा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

वंजारवाडी येथील एका उसाच्या शेतात जुगारअड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती जामखेड पोलिसांना मिळाली होती. यावरून जामखेड पोलिसांच्या गुन्हा शोध पथकाने शनिवारी पहाटे उसाच्या शेतात झोपडी बांधून सुरू असलेल्या जुगारअड्डय़ावर छापा टाकला. यात पाच लाख रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले. या जुगारअड्डय़ावर विनापरवाना ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळला जात होता. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संदीप आजबे यांच्या फिर्यादीवरून 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक संभाजी शेंडे तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस नाईक संभाजी शेंडे, कॉन्स्टेबल संग्राम जाधव, विजय कोळी, अरुण पवार, संदीप आजबे, धनराज बिराजदार यांनी ही कारवाई केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post