थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखेंची एंट्री, नगरपरिषद जिंकण्यासाठी वज्रनिर्धार

थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखेंची एंट्री, नगरपरिषद जिंकण्यासाठी वज्रनिर्धार संगमनेर : कोरोनाच्या संकटात ज्यांच्यावर जबाबदारी होती, ते मुंबईत जाऊन बसले होते. या संकटात तालुक्याचे लोकप्रतिनिधी खरेच कार्यरत होते का? येथे खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लाखो रुपयांची लूट केली. त्याची चौकशी होणे आवश्यक आहे, अशी टीका माजी विरोधी पक्षनेते व आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केली.


सोमवारी शहरातील मालपाणी लॉन्स येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने वज्रनिर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, सरचिटणीस सुनील वाणी, तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणफुले, नगरसेविका मेघा भगत, माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे, शिर्डी लोकसभा समन्वयक योगीराज परदेशी आदी उपस्थित होते.

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पहिला मेळावा संपन्न होतो आहे. संगमनेर तालुक्यात वाळू, खडी, प्लॉट ठेकेदार असून येथे भष्टाचार आणि ठेकेदार संस्कृती आहे. ही संस्कृती संपवायची असेल, तर ती सुरुवात संगमनेर नगरपरिषदेपासून केली पाहिजे. पुन्हा येऊन बुथनिहाय आढावा घेणार आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे रणशिंग विखे यांनी फुंकले.

केंद्र सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याला १५८ कोटी २७ लाख ५४ हजार रुपये मिळाले. मात्र, याचे श्रेय भलतेच घेत आहेत. केंद्र सरकारमुळे लस मिळाली. आपल्या राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले. मात्र, मुख्यमंत्री स्वतःचीच पाठ थोपटून घेतात. राज्यात अनेक योजना केंद्र सरकारच्या राबविल्या जातात, परंतु श्रेय भलतेच घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post