नगर जिल्ह्यात महिला सरपंचाला भाजप कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ व मारहाण, रुपाली चाकणकर संतापल्या...

नगर जिल्ह्यात महिला सरपंचाला भाजप कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ व मारहाण, रुपाली चाकणकर संतापल्या... नगर- भाजपाच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या गुंडांनी आपल्याला लाथ मारून आपला अपमान केल्याचा गंभीर आरोप एका महिला सरपंचाने केला आहे. यासंदर्भातला एक व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये या महिला सरपंच त्यांना ग्रामसभेत आलेला अनुभव कथन करत असून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी करत आहेत. तसेच, पोलिसांकडून देखील अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप देखील या महिला सरपंचांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर या गुंडशाहीचा धुडगूस थांबवावा, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्वीटमधून केली आहे.

“उक्कडगावच्या एका महिला सरपंचाला भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण आणि अत्यंत खालच्या पातळीच्या शिव्या दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. मी स्वतः नगर पोलीस आयुक्तांशी बोलले आहे. आरोपींवर कडक कारवाई व्हावी आणि या गुंडशाहीचा धुडगूस थांबवावा”, असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

 नगर जिल्ह्यातील उक्कडगावमध्ये राणी मच्छिंद्र काथोरे या सरपंच आहेत. बुधवारी ८ सप्टेंबर रोजी त्यांनी तंटामुक्ती अध्यक्ष निवडताना ग्रामपंचायचीमध्ये गोंधळ झाला आणि त्यातून विरोधी पक्षाच्या लोकांनी गुंडांकरवी आपल्याला त्रास दिल्याचा आरोप राणी काथोरे यांनी केला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post