विशिष्ट ठिकाणच्या बदलीसाठी कर्मचारी आग्रह करु शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

 

 विशिष्ट ठिकाणच्या बदलीसाठी कर्मचारी आग्रह करु शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकालबदलीवरून सरकारी किंवा खासगी नोकरीतील कर्मचारी आणि संबंधित प्रशासनात वाद होत असतात. मात्र सर्वोच्च न्यायालयाने  उत्तर प्रदेशातील एका प्रकरणात बदलीसंदर्भात महत्त्वाचा निकाल दिला आहे. इच्छित स्थळी बदलीसाठी कर्मचाऱयांना विनंती करता येईल, परंतु तो विशिष्ट ठिकाणी बदलीचा आग्रह करू शकत नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सोमवारी झालेल्या या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला आहे. अमरोहामधील एका महाविद्यालयामध्ये याचिकाकर्त्या महिला मानसशास्त्र्ााच्या प्राध्यापिका म्हणून काम करतात. मात्र त्यांना नोएडामध्ये पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये बदली करून हवी होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने यासंदर्भातली त्यांची याचिका 14 सप्टेंबर 2017 मध्ये फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात सुरू असलेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post