बंगालमध्ये भाजपला सुरुंग...तब्बल 24 आमदार ममतादिदींच्या संपर्कात

बंगालमध्ये भाजपला सुरुंग...तब्बल 24 आमदार ममतादिदींच्या संपर्कात कोलकाता - पश्चिम बंगालमधील भाजपचे आमदार सौमेन रॉय पुन्हा टीएमसीमध्ये परतल्यानंतर, आता तृणमूल नेते मुकुल रॉय यांनी, येणाऱ्या काळात अनेक भाजप आमदार टीएमसीमध्ये सामील होऊ शकतात, असा दावा केला आहे. रॉय म्हणाले, ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम करू इच्छिणारे 24 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. तसेच, टीएमसीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांची मोठी रांग आहे. 

याचा वर्षी जूनमध्ये, मुकुल रॉय स्वतःच भाजप सोडून टीएमसीमध्ये परतले आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांनी टीएमसीमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व स्वीकारले.   गेल्या चार आठवड्यांत सौमेन रॉय, विश्वजित दास आणि तन्मय घोष यांच्यासह भाजपचे चार आमदार टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्वच मुकुल रॉय यांच्या जवळचे मानले जातात आणि हे सर्व 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, मुकुल रॉय यांच्यामुळेच भाजपमध्ये सामील झाले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post