मनपात तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय बदलणार! बड्या मंत्र्याचे सूतोवाच...

मनपात तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय बदलणार! बड्या मंत्र्याचे सूतोवाच... पुणे: महापालिका निवडणूकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग हा मंत्रीमंडळाचा सामूहिक निर्णय आहे. पण त्यात मतमतांतरे असू शकतात, त्यामुळे येत्या बुधवारी मंत्री मंडळाच्या बैठकीत यावर फेरविचार होऊ शकतो असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात  यांनी सांगितले.

काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांबरोबर बोलताना थोरात म्हणाले, यावर चर्चा होणे स्वाभाविक आहे, तसेच काही मते वेगळी असणेही शक्य आहे. मंत्री मंडळात निर्णय झाला त्यावेळी एकमतानेच झाला. नंतर यावर झालेल्या चर्चेत काही जणांची मते वेगळी असल्याचे लक्षात आले. त्याचाही विचार व्हायला पाहिजे. त्यामुळे बुधवारी यावर फेरविचार होऊ शकतो. 

 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post