मोबाईल...एक फार मोठे वरदान

 मोबाईल शाप की वरदान !
आजच्या काळात सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञान फारच विकसित झाले आहे. मोबाईलचे तंत्रज्ञान इतके वाढले आहे की ती एक मोठी क्रांतीच झालेली जाणवते. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलेला आहे. घराघरातील प्रत्येक व्यक्तीजवळ मोबाईल पहायला मिळत आहे. त्यातही विलक्षण अशी विविधता आलेली आहे. घरातील फोनची जागा आता मोबाईलने केंव्हाच घेतली आहे. मुळातच कुठल्याही मोष्टीची माणसाला सहज सवय होते. तो त्याशिवाय राहू न शहणे यालाच व्यसन म्हणतात. परंतू सध्या चांगल्या वाईट अशा सगळ्याच गोष्टींना सर्रास व्यसनाचे नाव ठेवून समाज मोकळा होतो. अशा या मोबाईलच्या वापरामुळे कधी कधी मोबाईल नकोसा वाटू लागतो. त्यातूनच प्रश्‍न निर्माण होतो. मोबाईल शाप की वरदान?

ज्यावेळी ऐखादे नवीन तंत्रज्ञान निर्माण होते. तेव्हा ते माणवी सुखसोयी या दृष्टीनेच उद्यास येते. माणवाचे कल्याण साधने हाच ऐकमेव हेतू या तंत्रानामागे असतो. मोबाईल सुद्धा विकसीत स्वरुपाचे तंत्रज्ञान आहे. ते शाप कसे असेल ? ते एक फार मोठे वरदान आहे, असे मी मानतो.

कोविड 19 च्या काळामध्ये शाळा महाविद्यालये बंद होती मात्र मुलांचे शिक्षण चालू होते. तर हे कशामुळे शक्य झाले तर ते फक्त मोबाईलमुळेच म्हणजे मोबाईल वरदान म्हणालया हवे ! पण त्या मोबाईलचा वापर कसा करायचा ? किती वेळ करायचा ? त्यात काय वापरायचे ? काय वापरु नये? या सर्व गोष्टींचे ज्ञान पालकांना व मुलांना असणे गरजेचे आहे. ग्रामीण भागामध्ये फार कमी पालकांकडे अ‍ॅनड्रॉईड मोबाईल आहेत. ते दिवसभर कामावर जात असल्यामुळे मुलांना मोबाईल हा फक्त सकाळ आणि संध्याकाळ या वेळेतच हाताळायला मिळतो. त्यावेळी पालक स्वत: घरी असतात. त्यावेळी आपला पाल्य मोबाईलवर काय करतो हे स्वत: लक्ष ठेवू शकतात. त्यांना योग्य त्या शैक्षणिक माहितीचा व्हिडिओ डाऊनलोड करुन त्याद्वारे त्यांचा अभ्यास करुन घेवू शकातात. मात्र त्यात एक अडचण आहे. मुलांचे लक्ष वेधून अभ्यासविषयक व्हिडिओ व अ‍ॅप शोधणे हे फार कठिण होवून बसते. कारण माणवी मन हे फार चंचल आहे.त्यातच जर ते 1 ते 14 वयोगटातील असेल तर ते अधिक काळ एकाच ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. त्यामुळे मुलांना कृतीप्रविण करणारे अभ्यासात आवड निर्माण करणारे शैक्षणिक अ‍ॅप शोधावे लागतील, त्यासाठी पालकांनी स्वत:ला कळले नाही तर शिक्षकांसोबत अथवा गावतील तंत्रस्नेही नागरीकांशी चर्चा करणे गरजेचे आहे.

सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे जास्त काळ घरात बसून आहेत. मुलांनी शारीरीक हालचाल खूप मंदावली आहे. त्यांच्या शरीरावर इतरही दुष्पपरिणाम होवू शकातात. त्यामुळे पालकांनी अभ्यासाबरोबरच मुलांशी गप्पा मारणे, विविध खेळ खेळणे मैदानी खेळाबरोबरच योगाभ्यास व व्यायाम करणे यासाठी पालकांनी वेळ काढणे खूप गरजेचे आहे. 

पण आपले दुदैव असे की पालकांनाच आपल्या पाल्यासाठी वेळ नसतो. कुटूंबाच्या उदरनिर्वाह व प्रगतीसाठी तो अर्थाजनामध्येच ऐवढा गुंतून जातो की, ज्या कुटूंबाचा कळस त्याचा पाल्य आहे, त्याकडे त्याचे पूर्णपणे दुर्लक्ष होवून जाते. 

मोबाईलच्या बाबतीत मुलांची आवड आणि हट्ट यासाठी शहरी पालकांचे नवीन प्रश्‍न असतात. त्यांची आर्थिक सुबत्ता चांगली असल्यामुळे ते मुलांना स्वतंत्र मोबाईल घेवून देतात. मग काय, मुलांची मज्जाच मज्जा! पालक दिवसभर कामावर आणि मुल मोबाईलवर ! अशा ठिकाणी मोबाईल वापराचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येतात. वय लहान पालकांशी योग्य तो संवाद नाही, त्यामुळे मुले इंटरनेटच्या वापराने त्यांच्या वयाला व बुद्धीला न पेलणारे असे नवनवीन काहीतरी बघण्याचा प्रयत्न करतात. त्यातच गेम्सचे फॅड तर हल्ली खूपच ! नवनवीन गेम्स डाऊनलोड करणे आणि ते खेळत तासणतास वेळ घालविला जातो. पालक दिवसभर कामात त्यामुळे घरी येवून त्यांना घरातला कुठलाच ताण घ्यावा वाटत नाही. त्यामुळे आपल्या मुलाने दिवसभर काय केले ? यासाठी त्यांच्याशी गप्पा मारणे, अभ्यासाची चौकशी करणे यासाठी त्यांना वेळ नसतो. आणि मिळालाच वेळ तर ते देखील स्वत:च्या मोबाईलवर व्यस्त असतात. 

त्यातल्यात्यात किशोरवयीन मुलामुलींमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईल वापराचे आणखी एक आकर्षण असल्याचे आढळून येते, ते म्हणजे व्हॉट्सअ‍ॅट, इन्स्टाग्राम, फेसबुक अशा सोशल साईट्सच्या माध्यामातून भरपूर गप्पा मारणे, या माध्यमातून मित्र-मैत्रिण जोडणे, मग नकळतपणे घरातील पालकांच्या नजरेआड घर, कुटूबं, परिवार, नातेवाई, आवडी, निवडी, घराच्या सदस्यांच्या बाहेर जाण्याच्या वेळा अशी गोपणीय माहिती  ऐकमेकांना शेअर केली जाते. परिणामी त्याचे वाईट दुष्परिणाम कालांतराने संपूर्ण कुटूंबाला भोगावे लागातात. मैत्रीच्या नावाखाली सर्व गोपणीय माहितीच्या आधारे एकतर बँक खाते रिकामे केले जाते किंवा तरुण मुली ब्लॅकमेलींगला बळी पडतात. 

आपले भविष्य असेलेल्या आपल्या मुलांवर आपण कुठलाही दबाव न आणता मैत्रीपुर्ण संवाद ठेवणे खूप आवश्यक आहे. आज घराघरात सर्व सुखसोयी आहेत. पण सुसंवादाला वेळी नाही. त्यामुळे मुलाशी गप्प-गोष्टी,चांगल -वाईट, अनुभव मार्गदर्शन यासाठी कुटूंबात एक खेळीमेळीचे वातावरण असणे गरजेचे आहे. मोबाईल वापराला व्यसन हे नाव देवून ते सोडविण्यासाठी धाकदपटशाही करणे, मारणे, ओरडणे, धाक दाखवणे हे सर्व उपाय आता कालबाह्य झाले आहेत. या प्रकारांनी मुले सुधारण्याऐवजी घर सोडून निघून जाणे आत्महत्या करणे, जास्तच हट्ट करणे किंवा उर्मटपणे वागणे असे प्रकार करतात. त्यापेक्षा मुलांच्या भावविश्‍वाप्रमाणे जगून त्यांच्या विश्‍वातील त्यांना योग्य वाटत असणार्‍या गोष्टी पुढे त्रासदायक होतील, याबाबत पालकांनी मुलांना उदाहरण व दाखले द्यावेत. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून, मित्र बनून गप्पा माराव्यात. त्यांच्या मोबाईलवरच्या अभ्यासात कधीतरी स्वत:देखील सहभागी व्हावे. कमीत कमी इंटरनेटचा वापर असलेले अ‍ॅप्स त्यांना शोधून द्यावेत. ज्यात त्यांना स्वत:च्या कृतीचा जास्तीत जास्त वापर करुन अभ्यास करता येईल. त्याचप्रमाणे मोबाईलवर काय पहावे आणि कशापासून दूर रहावे हे समजवावे. 

मुलांजवळ बसून पालक स्वत:च जर मोबाईलवर व्यस्त राहत असतील तर मग मुलांना देखील मोबाईल हाच माझा मित्र आहे, असे वाटेल.त्यामुळे मुलांनी कमीत कमी मोबाईल वापरावा असे वाटत असेल तर पालकांनी स्वत:ला तशी शिस्त घातली पाहिजे. घरात आपल्याबरोबर सर्वांनीच किती वेळ मोबाईल हाता घ्यावा, किती वापरा, यावर स्वत:च स्वत:चे नियंत्रण ठेवावे. घरातील कुटूंब सदस्यांनी कितीवेळ मोबाईलचा वापर करावा, याबद्दल गाईडलाईन्स बनवावेत. तरच आपण आपल्या नवीन पिढीस एक निकोप आरोग्यदायी असे विचारप्रवर्तक  वातावरण व संस्कार देवू शकू. म्हणूनच पालकांनी मुलांचे मोबाईलचे व्यसन म्हणून त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सुधारावा आणि मोबाईल हा खरोखर ‘एक शाप नसून वरदान आहे’. मात्र ते ‘वरदान ठरावे’ यासाठी पालक म्हणून स्वत: जागरुक असणे आवश्यक आहे. 

लेखक - सचिन ठाणगे , प्राथमिक शिक्षक

जि.प.प्रा.शा. धोत्रे खुर्द, ता.पारनेर, जि.अ.नगर 

मो.7588600293

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post