नगर जिल्ह्यात खळबळ...एसटी बसमध्ये चालकाने गळफास घेऊन आत्महत्या

 एसटी बसमध्ये चालकाने घेतला गळफाससंगमनेर : एसटी बसमध्ये चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास संगमनेर बसस्थानकात उघडकीस आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून आत्महत्या कोणात्या कारणाने केली हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. सुभाष तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे या चालकाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये सुभाष तेलोरे यांनी गळफास घेतला. हा प्रकार सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास येथील काही कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. एम. एच. १४, बी. टी. ४८८७ क्रमांकाच्या पाथर्डी-नशिक या बसमध्ये तेलोरे यांचा मृतदेह आढळून आला असून याच बसवर ते चालक म्हणून कर्तव्यावर होते. दरम्यान काल रात्री त्यांनी डेपोमध्ये बस लावल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post