जिल्ह्यात तलाठी महिलेस अश्लिल शिवीगाळ, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तलाठी महिलेस अश्लिल शिवीगाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलराहुरी –  राहुरी तालुक्यातील चिंचोलीफाटा येथील प्रवरा नदीपात्रातील अवैध वाळू उपसावर दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाई नंतर त्याठिकाणी पुन्हा वाळू उपसा सुरू झाला का? याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका कामगार तलाठी महिलेस अश्लिल शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका जणावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यातील महिला कामगार तलाठी व दोन कर्मचारी चिंचोलीफाटा येथील प्रवरा नदीपात्रात पाहणी करीत असताना तेथे वाळू तस्करी करणारा महेश राजेंद्र सोनवणे आला व त्याने महिला तलाठीस तू माझे वाळूचे तरफा कोणाला विचारून सोडून दिले. असे म्हणून अश्लिल भाषेत शिवीगाळ करून लज्जा उत्तन्न होईल, असे वर्तन करून तू कशी काम करते? तेच पाहतो, अशी धमकी देऊन महिला तलाठी हिचा विनयभंग करून सरकारी कामात अडथळा आणला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post