किरीट सोमय्या यांचे जिल्हा भाजपतर्फे जोरदार स्वागत...व्हिडिओ

 किरीट सोमय्या यांचे जिल्हा भाजपतर्फे जोरदार स्वागत...व्हिडिओनगर : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करीत बड्या नेत्यांना जेरीस आणण्याचे काम भाजप नेते माजी खा.किरीट सोमया यांनी चालवले आहे. भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ अशी वेगळी प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे. यापार्श्वभूमीवर नगर जिल्हा दौर्‍यावर आलेल्या किरीट सोमय्या यांचे पारनेरमध्ये जिल्हा भाजपने जल्लोषात स्वागत केलं. कार्यकर्त्यांसमवेत चहा भजींचा आस्वाद घेत सोमय्या यांनी या स्वागताचा स्विकार केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, बाळासाहेब महाडिक, सुभाष दुधाडे, सुनिल थोरात, बाळासाहेब भेगडे आदी यावेळी उपस्थित होते. सोमय्या यांनी पारनेर साखर कारखान्याच्या विक्रीबाबत आवाज उठविण्याची विनंती कारखाना बचाव कृती समितीने केली होती. कृती समितीने ईडीकडेही तक्रार केली आहे. या अनुशंगाने कारखाना विक्रीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी सोमय्या पारनेरमध्ये दाखल झाले. जिल्हा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमय्या यांचे जोरदार स्वागत करीत अनेक प्रश्न त्यांच्यासमोर मांडले.

video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post