नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ सोमय्यांच्या रडारवर, कोट्यवधींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप

नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ सोमय्यांच्या रडारवर, कोट्यवधींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप



 मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी  आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत. 

ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावं मी जाहीर केली होती. दुर्दैवाने राखीव नावं आहेत. प्रताप सरनाईक, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड, यशवंत जाधव, यामिनी जाधव, अनिल परब, अनिल देशमुख, यांची नावं होती..

आता हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियाने शेकडो कोटीचे घोटाळे केले आहेत. फक्त तेव्हढचं नव्हे तर बोगस कंपन्याद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लाँडरिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं याचे २७०० पेजेसचे पुरावे आहेत, ते मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post