मृतदेहाची हेळसांड व विटंबना... नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल

मृतदेहाची हेळसांड व विटंबना... नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल  नगर : मुलाच्या आत्महत्येस पोलिस कर्मचारी जबाबदार असल्याने, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मृतदेह थेट पोलिस ठाण्यात आणून त्याची हेळसांड व विटंबना करणाऱ्या ३० ते ३५ अनोळखींवर गुन्हा दाखल झाला आहे.

एका गुन्ह्यात संशयित म्हणून बालमटाकळीतील आदित्य अरुण भोंगळे (वय १७) यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची चौकशी करून त्यास दुसऱ्या दिवशी सोडून दिले. मात्र, त्याने मंगळवारी  बालमटाकळी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यामुळे मुलाची आई संगीता भोंगळे यांनी, पोलिसाच्या जाचास कंटाळून मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप करीत, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात रुग्णवाहिकेसह आणून ठेवला. संबंधित प्रकरणातील दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. मात्र, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी नातेवाइकांची समजूत घातल्यानंतर त्यांचा रोष कमी झाला. मृतदेहाची हेळसांड व विटंबना केल्याने ३० ते ३५ अनोळखी नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post