नगर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना घनश्याम शेलार यांनी दिली भेट, आ.पाचपुते अद्याप न फिरकल्याने ग्रामस्थ नाराज

नगर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना घनश्याम शेलार यांनी दिली भेट, आ.पाचपुते अद्याप न फिरकल्याने ग्रामस्थ नाराज

 नगर - नगर -श्रीगोंदा मतदार संधातील  अतिवृष्टी झालेल्या भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी पाहणी केली .नुकसानग्रस्त झालेल्या  शेतकऱ्याशी भेट घेतली . सर्व शेतकऱ्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वरीष्ठ पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. नगर तालुक्यात पाच दिवसा पूर्वी आगड गाव , रतडगाव देवगाव परिसरात ढग फुटी झाली यामुळे शेतक -याचे शेतीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .नदयाना पाणी आल्यामुळे उभे पिके वाहून गेली .बंधारे फुटले नदी काठचे असलेले सरक्षण भिंत वाहून गेल्या . पुलाचा कठडे तुटले , पुल खचले . रतडगाव येथील पुल पाण्याखाली गेल्यामुळ वाहतुक दोन दिवस बंद झाली . देवगाव येथील बंडू गायकवाड यांचे अधी एकर क्षेत्र पुर्णपणे वाहून गेले.जनावराचे गोठे पडले . सिताफळाची बाग , झेंडूची शेती , बाजरी , सोयाबीन सारखे पीक पुर्णतः उध वस्त झाले . रतडगाव येथील स्मशानभूमी चे पत्र्याचे शेड पुर्ण पणे पडले . या सर्व नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली शेतक -याशी चर्चा केली असता तलाठी यानी फक्त पाहणी केली पंचनामे केले नाही . तहसीलदाराचा आदेश आला नाही आदेश आल्यावर लगेच पंचनामा करू असे सांगीतले . शेलार यांनी तहसीलदार उमेश पाटील यांच्याशी पंचनाम्याबाबत  चर्चा केली असता तलाठी यांना उद्या पासून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगीतले . तलाठी , कृषि अधिकारी , ग्रामसेवक उदया पासून एकत्रीत पंचनामा करणार आहे . सर्व शेतक त्याचे पंचनामे करणार असल्याचे सांगीतले . यावेळी केशव बेरड , रोहिदास कर्डीले, विठठल वामन , बाबा पगारे सह शेतकरी उपस्थित होते .

दरम्यान,अतिवृष्टी होऊन पाच दिवस झाले तरी आ. बबनराप पाचपुते या भागाकडे फिरकले नसल्यामुळे शेतक त्यामध्ये नाराजी दिसून आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post