करूणा शर्मांच्या गाडीत पिस्तुल ठेवण्यात आली?...व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

करूणा शर्मांच्या गाडीत पिस्तुल ठेवण्यात आली?...व्हायरल व्हिडिओमुळे खळबळबीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांचा रविवारचा परळी दौरा वादग्रस्त ठरला. त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने खळबळ उडाली. सायंकाळी करुणा शर्मांवर ॲट्रॉसिटी व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला.

करुणा शर्मा यांच्या चारचाकी गाडीतून पिस्तूल जप्त केले होते. मात्र, त्यानंतर काही वेळाने वैद्यनाथ मंदिराजवळून त्यांची गाडी मार्गस्थ होताना मागील डिकी उघडून तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या एका महिलेने काहीतरी वस्तू गाडीत ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. गाडीत आढळलेले पिस्तूल त्या व्यक्तीनेच ठेवल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि दबाव टाकून माझ्या गाडीत रिव्हाल्वर टाकली आणि  माझ्या वरील खोटे गुन्हे दाखल केले आहे. धनंजय मुंडे यांनी जोर जबरदस्ती बळाचा वापर केला आहे, असा आरोप  शर्मा यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post