महाराष्ट्र हादरला...साकीनाका येथील ‘त्या’ बलात्कार पिडितेचा मृत्यु

महाराष्ट्र हादरला...साकीनाका येथील बलात्कार पिडितेचा मृत्यु

   


अमानुष अत्याचाराला सामोरं जावं लागलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. मुंबई पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते. पण ज्या अमानुष पद्धतीनं तिच्यावर अत्याचार झाले होते त्याचं वर्णनही करता येणार नाही. अतिरक्तस्त्राव झाल्यानं पीडितेची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. आज सकाळी तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं कळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील आज रुग्णालयात तिच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. 

पीडितेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून ती व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती महापौर पेडणेकरांनी दिली होती. पण तिचा अखेर मृत्यू झाला आहे. याप्रकरणातील एक नराधम गजागाड असून यात आणखी काहींचा समावेश होता का याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यामुळे आता आरोपीविरोधात खूनाच्या गुन्ह्याचीही नोंद केली जाणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post