गुजरात मध्ये राजकीय भुकंप , मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

 गुजरातच्या राजकारणात भूकंप; मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा



अहमदाबाद: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकले नाही. मात्र, रुपाणी यांच्या राजीनाम्याने गुजरातच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. 

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी थोड्या वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post