नगर तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब रोहकले यांची बिनविरोध निवड

 नगर तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब रोहकले यांची बिनविरोध निवडअहमदनगर -नगर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी  वाळुंज येथिल ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक  भाऊसाहेब रोहकले  यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा  मा. खा. स्व. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती  अभिलाष घिगे  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपसभापती  संतोष  म्हस्के,  रेवणनाथ चोभे, बन्सीभाऊ कराळे, उद्धवराव कांबळे सहसंचालक मंडळ उपस्थित होते. वांळुज येथिल ज्ञानदीप विद्यालयाच्या श्री. स्वामी विवेकानंद ग्रामविकास संस्थेचे संस्थापक सचिव असलेले भाऊसाहेब रोहकले सर १९९३ पासून सलग २८ वर्षे मुख्याध्यापक आहेत. राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे कौन्सिल सदस्य असून अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव आहेत. सन २००३पासून सलग १८ वर्षे नगर तालुका संघाचे सरचिटणीस होते. नगर तालुका व जिल्हयातील अनेक विनाअनुदानीत माध्यमिक शाळांना त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे . त्यांच्या नेतृत्वाखालील वाळुंज येथिल ज्ञानदीप विद्यालयाचा सेमी इंग्लिश माध्यमातून सातत्याने १०० % निकाल लागत आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post