नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस

नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी
पुणे : पुणे पोलिसांकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणेंविरुद्ध लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. DHFL कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे कोर्टाच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. 

आर्टलाईन प्राॉपर्टीड प्रायव्हेट लिमिटेडनं 25 कोटींचं कर्ज घेतले होते. नीलम राणे आर्टलाईन प्राॉपर्टीज कंपनीच्या सहअर्जदार आहेत. या २५ कोटीच्या कर्जाची परतफेड न केल्याने लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आआहे. डीएचएचएफएल कंपनीने केलेल्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले,  या संदर्भात केंद्र सरकारकडून एक पत्र गृह  विभागाला प्राप्त झालं होतं. ते आम्ही पुणे पोलीसांना दिले आणि  त्यानुसार लुकआऊट सर्क्युलर दिले आहे. 

भाजप नेते  अतुल भातखळकर यांनी या संदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला या बाबत अद्याप काही माहिती आलेली नाही. पण जर नारायण राणेंच्या पत्नी आणि मुलाविरुद्ध लूकआऊट नोटिस दिले असेल तर हे केवळ राजकीय सूडबुद्धीने राज्य सरकार कारवाई करत आहे. नारायण राणेंना ज्या बेकायदेशीर पद्धतीने अटक करण्यात आली होती. त्याचेच हे राज्य सरकारचे पुढील पाऊल आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post