राखी सावंत म्हणते....मोदीजी अमेरिकतून येताना माझ्यासाठी.... बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता राखीचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेला गेल्याचे कळताच ती त्यांना अमेरिकेहू काही वस्तू आणण्यासाठी सांगते. तिचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. 

फोटोग्राफरने विचारलेला प्रश्न ऐकून राखी दोन मिनिटे विचार करते आणि म्हणते, ‘नमस्कार मोदीजी, तुम्ही अमेरिकेला गेलात हे ऐकून मला आनंद झाला. तेथील सगळ्या भारतीयांना माझ्याकडून प्रेम आणि माझा संदेश त्यांना द्या. त्यांना सांगा की माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. भारतात परत येण्यापूर्वी माझ्यासाठी अमेरिकेहून काही तरी घेऊन या. काही वस्तू खरेदी केल्या नाहीत तर डॉलर घेऊन या.’

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post