राज्यसभेसाठी भाजप उमेदवाराचा अर्ज... शिवसेना, राष्ट्रवादी आम्हाला सहकार्य करतील...चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा

 


राज्यसभेसाठी भाजप उमेदवाराचा अर्ज... हिंदुत्त्वादी शिवसेना, राष्ट्रवादी आम्हाला सहकार्य करतील...चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावामुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुक होत असून आज भाजपच्यावतीने संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. संख्याबळ पाहता भाजपला विजयाची संधी नसल्याचे दिसत आहे, परंतु, उपाध्याय यांना अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चमत्काराचा दावा केला आहे. आमच्याकडे 119 संख्याबळ असून आणखी 20 मते जुळणे शक्य होवू शकते असे विधान त्यांनी केले आहे. राज्यसभेच्या या जागेसाठी कॉंग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील म्हणाले की, मी मूर्ख राजकारणी नाही की, संख्याबळ नसताना दावा करेल. राज्यसभेसाठी प्रतोदला मतदान दाखवून करावे लागते. मात्र दाखवून सुध्दा वेगळे मतदान केले तर सदस्याला कायद्याने अडचण येत नाही. शिवसेना, राष्ट्रवादीतील आमचे मित्र आम्हाला सहकार्य करतील असा दावाही पाटील यांनी केला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post