१० ते १५ दिवसांत कोरोना रुग्ण वाढता आलेख पाहाता...संस्थानने सहकार्य करावे : खा.डॉ.सुजय विखे

शिर्डी - १० ते १५ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढणार...संस्थानने सहकार्य करावे : खा.डॉ.सुजय विखे राहाता दि.१४ प्रतिनिधी तिसऱ्या लाटेत कोव्हीड रुग्ण संख्येचा वाढता आलेख पाहाता आरोग्य विभागाने पुन्हा सर्वोतोपरी उपाय योजनांची तयारी  करून सतर्क राहावे आशा सूचना खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिल्या. 

  तिसऱ्या लाटेत कोव्हीड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी राहाता तालुक्यातील आरोग्य सुविधांसह सर्व उपाय योजनांचा आढावा घेतला.लोणी येथील पीव्हीपी काॅलेज मध्ये कोव्हीड सेंटर पुन्हा करण्याबाबत त्यांनी बैठक घेवून सूचना दिल्या.ग्रामीण रुग्णालय राहाता व  शिर्डी येथील श्री साई बाबा संस्थांचे  साई बाबा सुपर हॉस्पिटल मध्ये "आरोग्य सेवा" कोविड आरोग्य केंद्राची पाहणी त्यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे समवेत करून त्यांनी उपाय योजनांबाबत महत्वपूर्ण सूचना केल्या.

मागील काही दिवसांपासून कोव्हीड रुग्णांची संख्या वाढत आहे.तिसऱ्या लाटेची सुरूवात असली तरी वेळीच दखल घेणे हेच सर्वांच्या हातात आहे.सद्य परिस्थितीत रुग्ण संख्येचा आलेख ज्या गतीने वाढत चालला  आहे ते पाहाता एक डॉक्टर या नात्याने आरोग्य सुविधांना  पुन्हा सक्रीय करण्याची वेळ आली असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

मागील संकटाच्या काळात राहाता तालुक्यात आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी  कार्यकर्ते अधिकारी आरोग्य विभागाने केलेले काम राज्यात वेगळेपण दाखविणारे होते.सामान्य रुग्णांना वेळीच सर्व सुविधा उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाल्याचा आवर्जून उल्लेख खा.विखे यांनी केला.

तिसरी लाट येवू नये ही अपेक्षा असली तरी अद्यापही लस न घेतलेले किंवा काही लक्षण आढळून आलेल्या व्यक्ति वेळीच उपचार घेत नाहीत.त्याचा परीणाम रुग्ण संख्या वाढण्यामध्ये होत असल्याकडे लक्ष वेधून खा.विखे म्हणाले की,वाढती रुग्ण संख्या पाहाता तालुक्यातील सर्व आरोग्य सुविधा पुन्हा सक्रीयतेने सुरू करणे महत्वाचे आहे.यासाठी कोव्हीड सेंटरमध्ये आॅक्सिजनच्या उपलब्धतेसह सर्वच सुविधांचा आढावा आपण अधिकाऱ्यां समवेत घेवून सूचना केल्या असल्याचे डाॅ विखे यांनी सांगितले.

 याप्रसंगी शिर्डी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजुरकर,अॅड रघुनाथ बोठे,श्री साई बाबा संस्थान इम्प्लॉय सोसायटीच्या अध्यक्षा श्रध्दा कोते, नगरसेवक अशोक गायके,उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,वैद्यकिय संचालक डॉ प्रीतम ,डॉ कडू ,तहसीलदार कुंदन हिरे,गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद म्हस्के, वैद्यकीय अधीक्षक डॉ गोकुळ घोगरे,नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डोईफोडे, डॉ मधुरा जोशी, डॉ कविता सलवार, डॉ शिल्पा सोनवणे,रोहित सप्रे व  आरोग्य अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.     


शिर्डी संस्थानच्या नवनिर्वाचीत मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची भेट घेवून खा.विखे यांनी त्यांचे  स्वागत केले आणि  विविध प्रश्ना संदर्भात चर्चा केली.संस्थानच्या कामगार  सोसायटीच्या वतीने  सभासदांना देण्यात येणाऱ्या कामगार अपघात विमा योजनैचा  १० लाख रूपयांचा  धनादेश खा.विखे यांच्या हस्ते  कुटुंबियांना प्रदान करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post