स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी यांची नियुक्ती.

 स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या  जिल्हाध्यक्षपदी मा.प्रसादजी शिंदे यांची नियुक्ती..०५ सप्टेंबर २१

  अहमदनगर-  'स्वाभिमानी शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य'च्या अहमदनगर जिल्हा शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी मा.प्रसादजी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


उपरोक्त महोदय सहशिक्षक पदावर कार्यरत असुन त्यांना विना तथा अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या शैक्षणिक समस्यांची जाण आहे.विविध शैक्षणिक उपक्रमात ते सहभागी होत असतात.त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग शिक्षक बांधवांच्या पूर्ण वेतन अनुदान व पेंशन आदी समस्या सोडविण्याकरिता व्हावा.यासाठी सदरील नियुक्ती करण्यात आली आहे.


यावेळी स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या विद्यादानाच्या पवित्र क्षेत्रातील कार्याबरोबरच विनाअनुदानित शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा मनोदय स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रसादजी शिंदे यांनी व्यक्त केला.


सदरील ZOOM द्वारे आयोजित निवडीवेळी  स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.पी.पाटील,महिला आघाडी प्रमुख सौ.नेहाताई गवळी,महासचिव ज्ञानेश पाटील चव्हाण,नाशिक विभागाचे अध्यक्ष राहुलजी खैरनार आदींच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.नवनिर्वाचित अहमदनगर जिल्हा अध्यक्ष यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post