बाजार समितीला नाव दादा पाटील शेळकेंचे ,पण कारभार भलताच प्रताप शेळके

 जि.प. उपाध्यक्ष प्रताप शेळके : नाव दादा पाटील शेळकेंचे पण कारभार भलताच 

 नेप्तीला बाजार हलवुन नगर बाजार समितीची जागा विकण्याचा डाव नगर- बाजार समितीचे संचालक मंडळ नामधारी असुन कारभार दुसरेच पाहतात .आदर्श चाललेल्या संस्था ताब्यात घेऊन त्याच्या जमिनी विकणे आणि दिसेल तेथे जमिनींवर डोळा ठेवण्याचा उद्योग नगर तालुक्यात सुरू आहे . नगर बाजार समिती नेप्ती उपबाजारात हलवुन नगरची जागा विकण्याचा काहींचा डाव आहे . नाव दादा पाटलांचे मात्र कारभार भलताच सुरू असल्याची टिका जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी बाजार समितीच्या नेत्यांवर व संचालक मंडळावर केली .

नगर बाजार समितीला आलेल्या कारणे दाखवा नोटीस संदर्भात नगर तालुका महाविकास आघाडीने पत्रकार परिषद आयोजीत केली . जि.प. सदस्य संदेश कार्ले , बाळासाहेब हराळ, शरद झोडगे , बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ , माजी संचालक संपतराव म्हस्के , पंचायत समितीचे सभापती संदिप गुंड , माजी सभापती रामदास भोर , उपसभापती दिलीप पवार , माजी उपसभापती रवि भापकर , गुलाब शिंदे , प्रकाश कुलट , भाऊ तापकिर आदि उपस्थीत होते .बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना संदेश कार्ले म्हणाले की , बाजार समितीमधील ज्या मुद्दयांच्या आधारे नोटीस निघाली त्याला उत्तर देण्याऐवजी व्यक्तिगत टिका केली गेली .आम्ही तक्रारदार असल्यानेच आम्हाला नोटीसा मिळाल्या . आम्ही कधीच सत्तेचा दुरपयोग केला नाही ऊलट भाजपच्या काळात चौकशी झाली त्यांनीच सत्तेचा वापर करीत चौकशी अहवाल दडवुन ठेवला . आम्ही दुरपयोग केला असता तर बाजार समिती केव्हाच बरखास्त झाली असती .
 

यावेळी बाबासाहेब गुंजाळ यांनी बाजार समितीने कर्मचारी फंड व पदोन्नतीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post