भाजपचे खा.सुप्रिया सुळेंना कर्जत जामखेड मतदारसंघात ‘सेल्फी’ घेण्यासाठी निमंत्रण....

 भाजपचे कर्जत जामखेड मतदारसंघात खा.सुप्रिया सुळेंना ‘सेल्फी’ घेण्यासाठी निमंत्रण....नगर : कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवून मतदारसंघातील प्रश्नांबाबत निवेदने दिली. या भेटीचे वृत्त प्रसारीत झाल्यानंतर आता भाजपने मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरुन आ.पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रसिध्दीप्रमुख सचिन पोटरे यांनी अमरापूर-भिगवण रस्त्याच्या दुरवस्थेचे फोटो सोशल मिडियावर अपलोड करून थेट खा.सुप्रिया सुळे यांना याठिकाणी खड्डयांसमवेत सेल्फी काढण्यासाठी यावे, असे निमंत्रण दिले आहे. आ.पवार यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेण्याऐवजी मंजूर रस्त्यांची कामे दर्जेदार व वेळेत करून घेण्याचा उपरोधिक सल्लाही पोटरे यांनी दिला आहे. ताई आमच्या कर्जत जामखेड मतदारसंघात खुप सेल्फी पॉईंट आहेत.. केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेण्यापेक्षा मंजूर असणाऱ्या रस्त्यांची कामे दर्जेदार व वेळेत करून घेतली तरी 5 वर्षा च भरीव काम होईल. अमरापूर भिगवण रोड #अभियंता_दिन

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post