पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस...भाजप 14 कोटी लोकांना देणार ‘हे’ गिफ्ट

 पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस...भाजपकडून १४ कोटी रेशनिंग बॅगचं मोफत वाटपनवी दिल्ली : १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. याच निमित्तानं भारतीय जनता पक्षाकडून १७ सप्टेंबर पासून पुढचे तीन आठवडे म्हणजेच ७ ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यासोबतच भाजपकडून 'सेवा आणि समर्पण' मोहीम राबवण्यात येणार आहे. 

सेवा आणि समर्पण मोहिमेच्या माध्यमातून करोना संक्रमण काळात भाजपच्या प्रतिमेला बसलेल्या जोरदार धक्क्याच्या नुकसानीची भरपाई करण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाणार आहे. इतकंच नाही तर भाजपच्या 'किसान मोर्चा'कडून मोदींच्या जन्मदिन देशातील प्रत्येक जिल्ह्यात 'किसान जवान सन्मान दिवस' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 


या दरम्यान भाजपकडून १४ कोटी रेशनिंग बॅगचं मोफत वाटप, 'थँक्यू मोदी'जी लिहिण्यात आलेले पाच कोटी पोस्ट कार्ड, नद्यांच्या साफसफाईसाठी ७१ जागांची ओळख पटवणं, सोशल मीडियावर हायप्रोफाईल कॅम्पेन, करोनाविरोधी लसीकरण तसंच पंतप्रधान मोदींच्या जीवनावर तसंच कामावर आधारीत माहिती देणारे सेमिनार आयोजित करण्यात येणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post