शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार दुपारचे भोजन, केंद्र सरकारची पीएम पोषण योजना

 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार दुपारचे भोजन, केंद्र सरकारची घोषणानवी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक पार पडली.  काही महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती मंत्री पीयूष गोयल आणि अनुराग ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 


 देशातील विद्यार्थ्यांसाठी पीएम पोषण योजना लागू करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत देशातील ११.२ लाख सरकारी, सरकारी अनुदानित  शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण विनामूल्य दिलं जाणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही योजना लागू असणार आहे आणि यासाठी सरकारनं १.३१ लाख कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशात सुरू असलेल्या मिड-डे मील योजनेची जागा घेणार आहे. राज्यांच्या सरकारांच्या मदतीनं या योजनेची केंद्राकडून अंमलबजावणी केली जाणार असल्याचं अनुराग ठाकूर म्हणाले. 
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post