पिंपळगांव माळवी तलाव परिसराचे होणार सुशोभिकरण - महापौर रोहिणी शेंडगे

अहमदनगर महानगरपालिकेच्‍या पिंपळगांव माळवी तलाव परिसराचे सुशोभिकरण करून नागरिकांना फिरण्‍यासाठी तलावाच्‍या कडेने जॉगिंग ट्रॅक तसेच बेंच बसविणार कोकण सृष्‍टीचा आनंद देणार -  मा.महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे 


     अहमदनगर महानगरपालिकेच्‍या पिंपळगांव माळवी तलाव परिसरात 700 एकर मोठी जागा असून या परिसराचा पर्यटनाच्‍या दृष्टिने विकास करण्‍यात येणार आहे. नुकत्‍याच झालेल्‍या पावसाने पिंपळगांव माळवी तलाव पूर्ण भरलेला असून त्‍या पाण्‍याचे पुजन नुकतेच मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी केले. तलावाच्‍या भिंतीच्‍या कडेला असलेली बाभळीची झाडे , वेगवेगळी छोटी ,मोठी अनावश्‍यक झाडे, गवत साफ सफाई करून भिंतीच्‍या कडेने जॉगिंग ट्रॅक तयार करून नागरिकांना फिरण्‍यासाठी तयार करणार. बसण्‍यासाठी बेंच तसेच पाम वृक्ष, नारळ, इत्‍यादी झाडे लावणार संरक्षणासाठी जॉगिंग ट्रॅकच्‍या बाजूने लोखंडी तार जाळी कंम्‍पौड बांधणार. पिंपळगांव माळवी तलाव परिसर शहरापासून अगदी जवळ आहे. निसर्ग संपन्‍न वातावरणामुळे या परिसरात नगरकरांना सुट्टीचा आनंद घेता येणार आहे. काही ठिकाणी विद्युत व्‍यवस्‍था करण्‍यात येईल.  नागरिकांना मनोरंजनासाठी बोटींग सुरू करण्‍याबाबत प्रक्रिया सुरू आहे. तसेच औरंगाबाद हायवे वर दिशा दर्शक फलक लावण्‍यात येणार आहे. बाहेरील नागरिकांना माहितीसाठी माहिती फलक लावण्‍यात येणार आहे असे मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी सागितले.


      यावेळी माजी शहरप्रमुख मा.श्री.संभाजी कदम म्‍हणाले पिंपळगांव माळवी तलाव महानगरपालिकेच्‍या मालकीचा असून शहराच्‍या विकासाच्‍या दृष्टिने या ठिकाणी पर्यटन केंद्र तयार करण्‍यासाठी आम्‍ही सर्वानी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्‍यामुळे प्रत्‍यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. या ठिकाणी विदेशातील फ्लेमिंग पक्षी तलावातील पाण्‍याचा आनंद घेण्‍यासाठी येत असतात. नगर शहराचा वाढता विस्‍तार पाहता मनोरंजनासाठी तलाव परिसर चांगल्‍या प्रकारे विकसीत करणार आहे जास्‍तीत जास्‍त पर्यटन कसे वाढेल यासाठी मा.शासनाकडे भरघोष निधीची मागणी करून निधी आणणार असे ते म्‍हणाले.

      यावेळी नगरसेवक मा.श्री.शाम नळकांडे, मा.श्री.सचिन शिंदे, मा.श्री.संतोष गेणाप्‍पा, पाणी पुरवठा विभाग प्रमुख श्री.आर.जी.सातपुते, उदयान विभाग प्रमुख श्री.मेहेर लहारे, श्री.संतोष तनपुरे, प्रसिध्‍दी विभाग प्रमुख श्री.शशिकांत नजान, श्री.मंगेश शिंदे, श्री.किशोर कानडे, श्री.धाडगे आदी उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post