पवार कुटूंबियांना साकारला ‘निसर्ग संपदा’ देखावा

                                          श्री गणेश - गौरी समोर

पवार कुटूंबियांना साकारला ‘निसर्ग संपदा’ देखावा     नगर -    चर्चरोड, मुंजोबा चौक येथील अन्नपुर्णा भोजनालयाचे संचालक कृष्णराव निवृत्ती पवार यांनी आपल्या घरी श्री गणेश व गौरी पुजन करुन ‘निसर्ग संपदा’ हा देखावा सादर केला आहे.   श्री. पवार कुटूंबीय गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण पुरक श्री गणेशाची स्थापना करुन सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करत असते. यंदाही त्यांनी ‘निसर्ग संपदा’ या थीमवर देखावा सादर केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षतोड केल्याने मनुष्याबरोबर अनेक प्राणी, पक्ष यांच्यावर मोठा परिणाम झाला आहे. सहजीवन ही साखळी आता तुटत चालली आहे, त्यामुळे जंगलातील प्राणी आता शहरात येऊ लागले आहे, त्यामुळे ही निसर्ग संपदा वाचविण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, असा संदेश या देखाव्यातून दिला आहे.

     सौ.सुरेखा पवार, मयुर पवार, सुवर्णा पवार आदिंनी यासाठी परिश्रम घेतले. श्री.पवार यांनी साकरलेल्या हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक भेट देत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post