सैन्यदलातील नोकरीसाठी बनावट दाखले...पोलिस व मिलिटरी इंटेलिजन्सची नगर जिल्ह्यात मोठी कारवाई...

 सैन्यदलातील नोकरीसाठी बनावट दाखले...पोलिस व मिलिटरी इंटेलिजन्सची नगर जिल्ह्यात मोठी कारवाई... 



नगर : सैन्यदलातील नोकरीसाठी बनावट दाखले तयार करून सैन्य दलाची फसवणूक करणा-या पाथर्डीतील शैक्षणिक संस्थाविरुद्ध पोलिस व नाशिक येथील मिलिटरी इन्टिलिजन्सने संयुक्त कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.  

शहरातील नाथनगरमध्ये मारुती शिरसाठ व त्याचे काही साथीदार हे बनावट शाळेची कागदपत्र तयार करून त्या मोबदल्यात पैसे स्वीकारून, बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने काही युवक सरकारी व सैन्यदलात नोकऱ्या हस्तगत करीत असल्याच्या माहिती मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व मिलिटरी इंटेलीजेंस देवळाली कॅम्प (नाशिक) यांनी छापा घातलेल्या ठिकाणी बनावट कागदपत्रांचा दस्तऐवज व त्या लागणारे साहित्य मिळून आले. 

संत भगवानवावा माध्यमिक व कनिष्ठ विद्यालय अकोला( ता.पाथर्डी), संत भगवानबाबा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय घाटशिळ  पारगांव (ता. शिरूर कासार जिल्हा बीड) , श्री नागनाथ विद्यालय पिंपळगांव (टप्पा) (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर),  जि. प. प्राथमिक शाळा चिंचपुर इजदे (ता. पाथर्डी जि. अहमदनगर) , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरी (ता.पाथर्डी जि.अहमदनगर)  या विद्यालयाचे दाखले व बनावट शिक्के व साहित्य आढळून आले.

आरोपी  मारुती आनंदराव शिरसाठ (वय ५२ रा. जांभळी ता. पाथर्डी ), दत्तु नवनाथ गर्जे (वय ४० रा. अकोला ता. पाथर्डी) कुंडलिक दगडु जायभाये (रा.अनपटवाडी ता.पाटोदा जि. बीड) मच्छिंद्र कदम (रा. मानूर ता शिरूर कासार, जि. बीड)  अजय उर्फ जय राजाराम टिळे (रा. वाडीवरे ता इगतपुरी जि. नाशिक) , शांताराम पंढरीनाथ अनार्थे (रा. पिंपळद ता.जि.नाशिक)  शासनाची फसवणुक केल्या बाबत  गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post