हर्षवर्धन पाचारणे याची राष्ट्रीय शूटींग स्पर्धेकरिता निवड ,अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने केला गुणगौरव

 हर्षवर्धन पाचारणे याची राष्ट्रीय शूटींग स्पर्धेकरिता निवड

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने केला गुणगौरवअहमदनगर : अहमदनगर सिटी रायफल शूटिंग क्लबच्या सहा खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे . अहमदाबाद ( गुजरात ) येथे नुकत्याच पार पडलेल्या आठवी पश्चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करून नेमबाजीत ठसा उमटवला . त्यामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या हर्षवर्धन शशिकांत पाचारणे या खेळाडूने नेत्रदीपक कामगिरी केल्यामूळे रायफल शूटिंग या राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे .या निवडीबद्दल  हर्षवर्धन पाचारणे याचा  अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ व ऐक्य मंडळाच्या वतीने गुणगौरव करून त्याला पुढील यशाबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या .

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी त्याचा पुष्पगुच्छ देऊन  सत्कार केला .या गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, जिल्हासरचिटणीस सुनील शिंदे, अखिल डीसीपीएस चे जिल्हाध्यक्ष संदीप भालेराव व नामांकित आय सर्जन डॉक्टर शशिकांत पाचारणे यावेळी उपस्थित होते .अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेने  सामाजिक बांधिलकी जपत हा गुणगौरव सोहळा कोरोना मुळे अतिशय साध्या पद्धतीने त्याला देशपातळीवरील स्पर्धेत खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या व त्याला मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय प्रशिक्षक छबुराव काळे यांचेही संघटनेने विशेष कौतुक केले आहे . .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post