आ. रोहित पवार उभारणार जगातील सर्वांत उंच ‘भगवा ध्वज’...video

आ. रोहित पवार  उभारणार जगातील सर्वांत उंच ‘भगवा ध्वज’... नगर (सचिन कलमदाणे): : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून    ऐतिहासिक खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात देशातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. या स्वराज्य ध्वजाची दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 15 ऑक्टोबरला प्रतिष्ठापना करणार आहे. तर आज कर्जतचे ग्रामदैवत गोधड महाराजांच्या मंदिरापासून देशातील विविध भागात ‘स्वराज्य ध्वज पूजन’ यात्रा निघालीये.

 74 मीटर उंचीचा भव्य-दिव्य भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे. या ध्वजाचा आकार 96X64 फूट असून वजन 90 किलो आहे. विशेष म्हणजे हा ध्वज देशातील 74 ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार असून 6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटर असा सलग 37 दिवस या ध्वजाचा प्रवास होणार आहे.

महाराष्ट्राच्या पावन भूमीत देशातील नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज उभारणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवानेते आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेने लोकसहभागातून आणि सहकार्यातून ‘स्वराज्य ध्वज पूजन यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे.

video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post