बस नदीत कोसळून भीषण अपघात...चार जणांचा मृत्यू

बस नदीत कोसळून भीषण अपघात...चार जणांचा मृत्यू  नवी दिल्ली - मेघालयमध्ये प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळून भीषण अपघात   झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तुरा येथून शिलाँग  ला जाणारी बस बुधवारी रात्री 12 वाजता रिंगडी नदीत कोसळली. नदीतील पाण्यामुळे बचावकार्यामध्ये अडथळा येत आहे. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी तातडीने बचाव पथक आणि आपत्कालीन सेवा दल दुर्घटनास्थळी दाखल झालं. या बचाव कार्यादरम्यान, आतापर्यंत चार मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. 

 मेघालयातील या अपघातग्रस्त बसमधून जवळपास 21 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 16 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं असून ते यामध्ये जखमी झाले आहेत. हा अपघात नोंगचरम पुलावर झाला.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post