शिवसेनेत गृहकलह, खासदारांकडून जीवाला धोका असल्याची माजी उपजिल्हाप्रमुखाचा आरोप

 शिवसेनेत गृहकलह, खासदारांकडून जीवाला धोका असल्याची माजी उपजिल्हाप्रमुखाचा आरोपवाशीम- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची खासदार भावना गवळी यांनी दिशाभूल केली. खासदारांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख हरीश सारडा यांनी केल्याने वाशीम जिल्ह्यातील गृहकलह विकोपाला गेला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भावना गवळी यांनी भेट घेतल्यानंतर सारडा यांनी थेट नागपूर गाठून पत्रकार परिषद घेतली. माझ्यावर यापूर्वीही दोन वेळा हल्ले झाले. धमकी देण्यात येत आहे. पोलिसांनी सुरुवातीला संरक्षण दिले आणि नंतर काढून घेतले. पोलिस उपअधीक्षकांनी मोबाइल जप्त केला. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. गवळी यांनी वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील शंभर कोटी रुपयांचा श्री बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखाना २५ लाख रुपयात खरेदी केला. त्यांचे खासगी सचिवांच्या भावना अॅग्रो प्रॉडक्ट अॅण्ड सर्व्हिसेसच्या नावावर हा व्यवहार झाला. हा घोटाळा उघडकीस आणल्यापासून धमक्यांचे फोन येत आहेत. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही अद्याप कारवाई झाली नाही. पोलिसांची खासदारांना साथ लाभली आहे. त्यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे सारडा म्हणाले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post