राष्ट्रवादीचा निर्धार...नगरची लोकसभेची जागा जिंकून विधानसभेच्या सर्व 12 जागा जिंकायच्या...

 नगरची लोकसभेची जागा जिंकून  विधानसभेच्या सर्व 12 जागा जिंकायच्या...अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवा – ना. जयंत पाटील
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी व अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक आज प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी घेतली. निवडणुकीत आपण ५४ नाही तर ९०-१०० जागा जिंकू शकतो, मात्र यासाठी आपल्याला संघटना बांधणीवर भर द्यावा लागेल. आपण सत्तेत आहे म्हणून पक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे . मार्गदर्शन यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
नगर जिल्हा हा आदरणीय शरद पवार साहेबांवर प्रेम करणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने नेहमीच पवार साहेबांना साथ दिली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील १२ पैकी ६ जागा राष्ट्रवादीने पटकावल्या. मात्र आपल्याला ही संख्या द्विगुणीत करायची आहे. मागील लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपयश आले, मात्र आगामी निवडणुकीत आपला व आपल्या उमेदवाराचा जनसंपर्क वाढवा. याच जनसंपर्काचा उपयोग करून जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद आपल्याला वाढवायची आहे. पुढील वेळी लोकसभेतही पक्षाला उत्तम यश मिळावे यादृष्टीने काम करा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार रोहित पवार, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, चंद्रशेखर घुले पाटील, दादाभाऊ कळमकर, पांडुरंग अभंग, राहुल जगताप, प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, अविनाश आदिक, प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम शेलार, प्रदेश चिटणीस अंबादास गारूडकर, राजेंद्र कोठारी, अहमदनगर जिल्हा निरीक्षक अंकुशराव काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा वर्षा शिवले, अहमदनगर जिल्हा युवक निरीक्षक किशोर मासाळ, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, युवती जिल्हाध्यक्षा राजराजेश्वरी कोठावळे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गालिब साबीर अली सय्यद, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे, वकील सेल जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश शिंदे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष सुभाषराव लोंढे आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post